सावंतवाडी
गणेशोत्सव अवघ्या ४० दिवसांवर येऊन ठेपला असतानाचं मुसळधार पावसामुळे गावच्या गाव पाण्याखाली गेली. या प्रलयामुळे मुर्तीकारांच मोठं नुकसान झालं असून मुर्त्या पुराच्या पाण्यात जमिनदोस्त झाल्या होत्या. माडखोल धवडकी, बांदा, ओटवणे आदि भागात हि घटना घडून ३०० हून अधिक मुर्त्या पुरात पाण्याखाली जात २०० हून अधिक मुर्त्यां उध्वस्त झाल्या होत्या. त्यात समोर फक्त 40 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाचा माध्यमातून या मुर्तीकारांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे. याबाबतची मागणी ते प्रशासनाकडे करणार आहे.