You are currently viewing शिवसेना कुडाळ शहर ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी शेखर उर्फ राजू गवंडे यांची निवड

शिवसेना कुडाळ शहर ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी शेखर उर्फ राजू गवंडे यांची निवड

कुडाळ :

कुडाळ शहरातील शिवसेनेचे धडाडीचे युवा कार्यकर्ते शेखर उर्फ राजू गवंडे यांची शिवसेनेच्या ओबीसी सेल कुडाळ शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि शिवसेना सचिव तथा खासदार मा.श्री.विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार मा.श्री.वैभवराव नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी, शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.रुपेश पावसकर, युवा कार्यकर्ते आंबडपाल ग्रामपंचायत सदस्य गोट्याशेठ चव्हाण, आमदार वैभव नाईक यांचे कट्टर समर्थक मंजूनाथ फडके, नितीन राऊळ, बाबी गुरव आणि शिवसैनिक उपस्थित होते.

राजू गवंडे हे शिवसेनेचे शहरातील एक आक्रमक आणि कट्टर शिवसैनिक म्हणुन ओळखले जातात. नगरसेविका सौ.श्रेया गवंडे आणि राजू गवंडे यांच्या माध्यमातून त्यांच्या वॉर्ड मध्ये अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. यापुढे, कुडाळ शहरात १७ ही वॉर्ड मध्ये बैठका घेऊन वॉर्ड अध्यक्ष जाहीर करण्यात येतील. ओबीसी सेल च्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटना वाढीवर भर देऊन शिवसेनेच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी दिलेले योगदान, विकासकामां संदर्भातील माहिती शहरात लोकांपर्यंत पोहोचवून कुडाळ नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा आपला निर्धार असल्याचे याप्रसंगी राजू गवंडे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा