माजी सरपंच कुडतरकर सह सदस्य व शिवसैनिकानी केला भाजपात प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या नेतूत्वाखाली काम करण्यास सेनेतून प्रवेश सुरूच..!
कणकवली
भारतीय जमता पार्टीने आज शिवसेनेला कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी गावात पुन्हा धक्का दिला.काही महिन्यांपूर्वी शेकडो शिवसैनिकानी भाजपात प्रवेश केला होता तसाच आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तोंडवली बावशीचे माजी सरपंच उमेश कुडतरकर यांनी ग्राम पंचायत सदस्य सौ.अंकिता कुडतरकर,श्री.समीर तावडे,नीलकंठ कुडतरकर अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजपा प्रवेश केला.
ओम गणेश निवस्थानी आम.नितेश राणे यांनी या सर्वांचे भाजपा पक्षात स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,सभापती मनोज रावराणे,तालुका अध्यक्ष संतोष कानडे व मिलिंद मेस्त्री,माजी सभापती दिलीप तळेकर,तालुका सरचिटणीस पंढरी वायगणकर,शक्ति केंद्र प्रमुखभाई मोरजकर,योगेश सदडेकर,सरपंच मनाली गुरव,उपसरपंच अशोक बोभाटे,सदस्य दिनेश कांडर,सचिन गावडे,अमित सदडेकर,सचिन गुरव,आनंद मोरजकर,प्रल्हाद कुडतरकर आदी उपस्थित होते.