मालवण
वायरी भूतनाथ येथील रहिवासी व पर्यटन व्यावसायिक कमलेश मोहन सावजी (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन बहिणी, काका, काकी, चुलत भाऊ- बहीण, भावजय, आत्या असा परिवार आहे. वायरी येथील जलपर्यटन व्यावसायिक नारायण, जयेंद्र व हेमराज सावजी यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत, तर मालवण मधील पत्रकार भूषण मेतर यांचे ते मामे भाऊ होत.