“युवा ग्रुप कणकवली” यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
बांदा
सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरासह,शेर्पे, इन्सुली आणि कणकवली गणपती साणा येथे पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना “युवा ग्रुप कणकवली” यांनी मदतीचा हात पुढे करीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. एकुण १२५ नुकसानग्रस्तांना यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी “युवा ग्रुप कणकवली चे” गणंजय तेली, प्रथमेश नानचे, योगेश कोदे, वैभव कोदे, प्रसाद नानचे, पांडुरंग गुरव, तुळशीदास कुडतरकर, उदयराज प्रभुपाटकर, संतोष पेडणेकर, अवधूत शिरसाट, यवलराव राऊत, प्रतिक रासम, यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गेल्या चार पाच दिवसांपूर्वी बांदा शहरासह, शेर्पे, कापईवाडी, देवुळवाडी, निगुडेवाडी, इन्सुली कुडवटेंब येथे मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे अनेकांचे संसार उघडे पडले. पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या या १२५ नुकसानग्रस्तांना ” युवा ग्रुप कणकवली ” यांनी मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कणकवली गणपती साणा येथील नदीच्या काठावर राहणाऱ्या कातकरी समाजातील ५ कुटुंबांच्या झोपडीत पुराचे पाणी शिरले आणि संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले ” युवा ग्रुप कणकवली” च्या वतीने कातकरी कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू,खाऊ वाटप आणि कपडे वाटप करण्यात आले. नुकसान झालेल्या या नुकसानग्रस्तांना “युवा ग्रुप कणकवली “यांनी मदत करीत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. “युवा ग्रुप कणकवली “यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.