You are currently viewing “मुस्लिम वेलफेयर फाउंडेशन” तर्फे पूरग्रस्तांना मदत

“मुस्लिम वेलफेयर फाउंडेशन” तर्फे पूरग्रस्तांना मदत

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ; १०८ कुटुंबियांना देणार लाभ…

सावंतवाडी

येथील बांदा, शेर्ले, वाफोली व दोडामार्ग तालुक्यात पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तांसाठी सावंतवाडी शहरातील “मुस्लिम हेल्थ अँड वेलफेयर फाउंडेशन” तर्फे मदत करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः पुढाकार घेवून संस्थेच्या माध्यमातून जमा केलेली मदत तब्बल १०८ कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत संबंधित नुकसानग्रस्त भागाकडे आज रवाना करण्यात आली. चार टेम्पो भरून विविध जीवनावश्यक वस्तू, तांदूळ, तेल आदी महत्त्वाचे साहित्य संबंधित नुकसानग्रस्तांना देण्यात येणार आहे. असे संस्थेचे पदाधिकारी हिदायतुल्ला खान यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्ष सोहाब बेग, सचिव सलीम मुल्ला,सहसचिव रिजवान पटेल,खजिनदार ताजुद्दीन शेख,सहखजिनदार मोहसीन मुल्ला, सदस्य तबरेज बेग, नदीम दुर्वेश, फारुक शेख, कुतुबुद्दीन शेख, बासित पडवेकर, मलिकजान नदाफ, अन्वर शहा, आसीम पीर, सोहेल बेग, सोहराब बेग, इमाद शेख, इर्शान बुरान, आसिफ शेख, सरफराज दुर्वेश, हुसेन शेख, मुजाहिद पिरजादे, रौनक वाडीकर, सोहेल करजगी, शौकत नदाफ, याकुब शेख, शोएब दुर्वेश, जाफर खणापुरी आदींच्या पुढाकाराने ही मदत गोळा करण्यात आली आहे.या उपक्रमाला सर्व धर्मियांनी सहकार्य करत मदतीचा हात पुढे केला, त्यामुळे फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.या मदतीचे वाटप आज संबंधित नुकसान ग्रस्त भागात होणारे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा