पर्यायी मार्गाने गाड्या वळविल्या, तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी प्रयत्न…
सावंतवाडी
पोकलेनची वाहतूक करणारा कंटेनर मळगाव बाजारपेठेतच बंद पडल्यामुळे आज सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली.त्याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागले.मात्र स्थानिकांच्या मदतीने वाहतूककोंडी सोडवत पर्यायी मार्गाने गाड्या वळविण्यात आल्या.दरम्यान संबंधित गाडीचा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी घटनास्थळी मेकॅनिक बोलविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधित कंटेनर हा रेडी येथून बांद्याच्या दिशेने जात होता.मात्र काल मध्यरात्री “तो” मळगाव बाजारपेठेत तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला.दरम्यान त्याच्या दुरुस्तीसाठी बोलविण्यात आले मॅकॅनिक उशीरा पोहोचल्यामुळे बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी झाली.त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.तर झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व गाड्या पर्यायी मार्गाने पाठविण्यात आल्या.यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला.दरम्यान गाडीतील बिघाड दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.