You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषद मालकीच्या दुकान गाळ्यांचा लिलाव प्रक्रिया स्थानिकांना प्राधान्य द्या

वेंगुर्ले नगरपरिषद मालकीच्या दुकान गाळ्यांचा लिलाव प्रक्रिया स्थानिकांना प्राधान्य द्या

मनसेची जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची वेंगुर्ले नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या कडे मागणी

वेंगुर्ले नगर परिषद मालकीच्या दुकान गाळ्यांचे लिलाव प्रक्रियेसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ..या लिलाव जाहिरातीमध्ये दिनांक 29 7 2019 सायंकाळी 5:30 वाजता ही अंतिम वेळ व तारीख नमूद आहे. परंतु सध्याच्या अतिरुष्टी तसेच करोना महामारी या कालावधीमध्ये दिलेली मुदत ही फारच अत्यल्प स्वरूपाची आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी DSC (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) तसेच पन्नास हजार रुपयाचा डी डी अशी अट ठेवण्यात आली असून, या सर्व पुर्ततेसाठी वेळ मात्र अत्यल्प ठेवला आहे. त्यामुळे स्थानिक वेंगुरला वासिय तसेच व्यवसायिक यामध्ये कमी प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे.. करोना महामारीलाॅक डावुन व अतिरुष्टीने स्थानिक व्यापारी व्यावसायिक मेटाकुटीस आलेले आहेत. त्यांना आधाराची गरज आहे. या शिवाय परप्रांतीय व्यावसायिक आज मोठ्या प्रमाणावर स्थानिक बाजारपेठांमध्ये आपले प्रस्थ वाढवत आहेत. यात स्थानिक व्यापारी व्यावसायिक मेटाकुटीस जात आहेत .तरी आपण आपल्या अधिकारात ई-लिलाव प्रक्रियात स्थानिकांना प्राधान्य द्यावे. अशी मागणी आज मनसेने निवेदनाद्वारे केली. ई-लिलाव प्रक्रियेत सामान्यांना सामावून नघेतल्या समस्त वेंगुर्ला वासिय नागरिकांकडून जनआंदोलन छेडण्यात येईल. भविष्यात या विषयी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असेही यावेळी चर्चेदरम्यान सांगण्यात आले.
परब यांनी मीडियाशी बोलताना सांगितले जे दुकान गाळेधारक पूर्वीपासून त्या ठिकाणी व्यवसाय करत होते, त्यांनासुद्धा या संपूर्ण प्रक्रियेत डावलण्यात आले आहे, याबाबत नगरसेवक मंडळींनी खरंतर आवाज उचलण्याची गरज होती, स्थानिक वेंगुर्ले शहरातील युवकांनी आज मनसेकडे याबाबत दाद मागितली आणि जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी वेंगुर्ला मनसे तालुकाध्यक्ष सनी बागकर यांच्या सह रुपेश कुडतरकर, नागेश गावडे,प्रथमेश नाईक,तुषार भाटकर, केतन सुकी,किरण राटे,तेजस किनळेकर, अथर्व धारगळकर, नितेश सुकी,युवराज सावंत. वेगुर्ले वासिय उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा