कोसळलेल्या मल्हार पुलाची पाहणी
कणकवली
कनेडी- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या नुकसानीची पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना नेत्यांनी आज पहाणी केली. कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करत स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास साकव उभारणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
अतिवृष्टीमुळे मल्हार पूल पुराच्या तडाख्याने कोसळल्याने या ठिकाणच्या पाचहुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देत आढावा घेतला.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक अबीद नाईक, बाळा भिसे, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, बेनी डीसोजा, डिवाय एसपी नितीन कटेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कातकरी अभियंता संजय शेवाळे, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, तहसीलदार रमेश पवार , बीडीओ अरुण चव्हाण, उपअभियंता के. के. प्रभू हेमंत सावंत, संतोष सावंत, आदी उपस्थित होते.