सिंधुदुर्ग :
कोरोना मुळे जवळपास बरेच महिनाभर वाहतूक बंद होती.
कोकण रेल्वे मार्गावरील गोव्याजवळील पेडणे येथील बोगद्यात पावसामुळे दडर कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील विशेष रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. आता पेडणे बोगद्यातील काम पूर्ण झाल्याने रेल्वेची वाहतूक सेवा पूर्ववत झाली आहे. कोरोना काळात काही विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत.
मध्य रेल्वेच्या काही मोजक्याच गाड्या आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सुरु आहेत. मात्र, दरड कोसळ्याने या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात पनवेल, पुणे, मडगाव मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. पेडणे बोगद्यातील काम पूर्ण झाल्याने रेल्वेची वाहतूक सेवा पूर्ववत सुरू होणार आहे
असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
चांगले काम, शुभेच्छा! Very Good !