मुंबई :
आयसीआयसीआय होम फायनान्सने (ICICI Home Finance) असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कुशल कामगारांसाठी ‘आपल्या स्वप्नाचं घर’ ही नवीन कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कंपनी २ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतची कर्ज दिलं जाणार आहे. सुतार, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, टेलर, पेंटर, वेल्डर, ऑटो मेकॅनिक, मॅन्युफॅक्चरिंग मशीन ऑपरेटर, संगणक यांत्रिकी, आरओ दुरुस्ती तंत्रज्ञ, लघु व मध्यम उद्योग मालक आणि किराणा दुकान चालकांसाठी ही योजना आहे.
आयसीआयसीआय होम फायनान्सने या संदर्भात निवेदन पत्र जारी केलं आहे. ही कर्ज योजना देशातील असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आहे, ज्यांना आपलं घर विकत घ्यायचं आहे परंतु त्यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे नाहीत, असं आयसीआयसीआय होम फायनान्सने म्हटलं आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की २० वर्षांच्या कर्जासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी किमान १,५०० रुपये ग्राहकांच्या खात्यात असले पाहिजेत. त्याचबरोबर पन्नास लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ३,००० रक्कम ग्राहकांच्या खात्यात असायला हवी.
असं आयसीआयसीआय होम फायनान्सचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध कमानी यांनी सांगितलं. याशिवाय, कंपनीने म्हटलं आहे की पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) संबंधित सर्व फायदे ग्राहकांना मिळू शकतात. कमी उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यम उत्पन्न गटांकरिता ही क्रेडिट लिंक सबसिडी योजना आहे.