You are currently viewing कासार्डेतील उद्योजक मनोहर उर्फ जीजी पाताडे यांचे निधन

कासार्डेतील उद्योजक मनोहर उर्फ जीजी पाताडे यांचे निधन

तळेरे: प्रतिनिधी

कासार्डे तांबळवाडीतील उद्योजक,कासार्डे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री मनोहर सदाशिव पाताडे ऊर्फ जीजी पाताडे यांचे शुक्रवार दि.२३.०७.२०२१ रोजी रात्री १०.३० ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.कासार्डे को.आॅपरेटिव्ह मायनिंग सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता.याशिवाय
अतिशय मेहनतीने त्यांनी मायनिंग क्षेत्रात यश मिळविले होते.गावातील वाडीतील कोणत्याही सार्वजनिक कामात ते नेहमीच पुढाकार घेत पुढे असायचे, सर्वाच्या
अडीअडचणीला धावून जाणारे जीजी म्हणून त्यांची ओळख होती.मनमिळावू स्वाभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे व सून व नातवंडे असा परिवार आहे.अंत्यसंस्कार शनिवार दि.२४.०७.२०२१ रोजी महालक्ष्मी मंदिर जवळील स्मशानभूमीत करण्यात आले.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उद्योजक
मनोहर पाताडे

प्रतिक्रिया व्यक्त करा