You are currently viewing केंद्र सरकारच्या कृषी विपणनाच्या अवसर चंदा या योजनेच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कृषी माल विक्री योजना प्रकल्प राबविण्यासाठी मा.केंद्रीय मंत्री श्री नरेंद्रसिंघ तोमर यांचे आदेश

केंद्र सरकारच्या कृषी विपणनाच्या अवसर चंदा या योजनेच्या माध्यमातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कृषी माल विक्री योजना प्रकल्प राबविण्यासाठी मा.केंद्रीय मंत्री श्री नरेंद्रसिंघ तोमर यांचे आदेश

श्री बाबा मोँडकर.जिल्हाध्यक्ष,सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग बी ६६ बॉल खारेपाटण ते पत्रादेवी या सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून कळविले आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे लक्ष वेधले होते .सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा असल्याने विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक उत्पादने फळप्रक्रिया तसेच कृषी उत्पादने विक्रीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बाजारपेठ उभारावी अशी मागणी पर्यटन महासंघाने श्री सुरेशजी प्रभू यांच्याकडे केली होती. कोकणच्या विकासात आपले नेहमीच योगदान राहील असे सांगून श्री सुरेशजी प्रभु यांनी या संदर्भात केंद्र सरकार कडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बोर्डाची अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बाजारपेठ उभारण्याच्या दृष्टीने अभ्यास करणे तसेच या बाजारपेठेचा प्रस्ताव कृषी विपणनाच्या एकीकृत योजनेअंतर्गत कृषी विपणन अवसर चंदा या योजनेत समाविष्ट करण्याचे व त्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. ही सर्व माहिती केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी प्रभू यांना पत्राद्वारे कळविली आहे. अशाप्रकारे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि त्याच बरोबर तिथल्या स्थानिक उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होईल यादृष्टीने सुरेश प्रभू यांनी घेतलेल्या या भूमिके बद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने त्यांचे आभार मानले आहेत अशी माहिती श्री. बाबा मोंडकर जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा