विशेष :
बहुतेकजण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आहेत असे धरून हा विषय मी आपल्या सर्वांसमोर मांडत आहे. जे इतरत्र आहेत ते आपापल्या ठिकाणी अशा प्रकारचे काम करू शकतात..
कोरोना काय इतक्यात आवरत नाही. अनेक कारणे, अनेक चुका आणि ते बोलत राहण्यात काही अर्थ नाही. महत्वाचा विषय हा की केंद्र असो की राज्य, सरकारे हतबल आहेत. आणि एकमेंकांवर आरोप करण्यात किंवा पळवाटा काढण्यात व्यस्त आहेत. आता प्रश्न हा, की आपण (तुम्ही मी सारे सामान्य नागरीक ज्यांचा मुख्य व्यवसाय राजकारण नाही) ते काय करणार.. अशा वेळीस नेहमीच परस्पर सहकार्याने, सामाजीक जाणीवा जपून अनेक भयंकर प्रश्नांवर उत्तरे निघाली आहेत. तोच विषय मी इकडे मांडत आहे..
कोरोना झालेले बहुतेक रुग्ण बरे होतच आहेत. जे बरे होत आहेत तो आपला विषय नाही. जे ५% रुग्ण दगावत असतील, त्यांचे काय हा विषय. आणि मला ह्यात म्हाताते कोतारे लोक देखील महत्वाचे वाटतात कारण “म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो”. तर अशा परीस्थितीत आढळलेली महत्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन ची कमतरता. बरेचदा असे जाणवत आहे की पुरेसा ऑक्सिजन देता आला असता तर काही काळ अधिक लढा देता आला असता. पण ऑक्सिजन मशीन्सची मर्यादीत संख्या व ह्या क्षेत्रातील अज्ञान हा खरा अडचणीचा विषय आहे.
एका चांगल्या कंपनीची ऑक्सिजन मशीन साधारण ४०००० (चाळीस हजार) रुपयाला पडते जी एकावेळी एका रूग्णाला सपोर्ट करू शकतो. अर्थातच अशा अनेक मशीन्स घेऊन ठेवणे कुठल्याच रुग्णालयाला परवडणारे नाही. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ४-५ मशीन्स एका रूग्णालयात असाव्यात. तर माझे आपणा सर्वांना आवाहन आहे की ज्यांना आर्थीक दृष्ट्या शक्य असेल त्यांनी अशी किमान एक मशीन “सामाजीक बांधीलकी” म्हणून घ्यावी व माफक दरात/भाडे तत्वावर सोशली उपलब्ध करावी. प्रत्येक तालूक्यात अशा १०० मशीन्स जरी आल्या तरी आपण कोरोना विरूद्धच्या युद्धात मोठी आघाडी घेऊ असे दिसते. अशा प्रकारे केलेल्या सोशल इनवेस्टमेंटचा मेडीकल सिस्टीमवर देखील ताण येणार नाही व भविष्यात कोरोनापश्चात काळात देखील अशा प्रकारच्या यंत्रणा आपल्याला सामाजीक दृष्ट्या उपयुक्त ठरतील..
ह्याची सुरूवात म्हणून मी स्वत: एक मशीन अमेझॉन वरून आज मागवत आहे. ही त्याची लिंक.
हे आपण कुणीही करू शकता. जर आपल्यापैकी कुणाला काही शंका असतील किंवा ह्याहुन अधिक चांगली काही कल्पना सुचवायची असेल किंवा चर्चा करायची असेल तर मला संपर्क करू शकता.
विनय सामंत, कुडाळ – सिंधुदूर्ग.
9325262692, 9820262692