You are currently viewing मराठा आरक्षण : मुंबई आणि पुणे ला उद्या दूध तुटवडा जाणवु शकतो.

मराठा आरक्षण : मुंबई आणि पुणे ला उद्या दूध तुटवडा जाणवु शकतो.

कोल्हापूर :

मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आणि आता जनतेमध्ये पुन्हा असंतोष वाढायला लागला आहे. सध्याचं महाविकासआघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात कमी पडलंय का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. मराठा समाज आता राज्यात आक्रमक होत असून अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे. मराठा आरक्षणप्रकरणी स्थगिती उठवून मराठा समाजाला कायमचे आरक्षण मिळावे यासाठी उद्या पुणे, मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद पाडणार असल्याचा इशारा मराठा समाज आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा दूध पुरवठा उद्या खंडित होणार आहे.

गोकुळ, वारणा, चितळे यासह मोठ्या प्रमाणात होणारा दुधाचा पुरवठा होऊ देणार नसून दूध टँकर अडवले जातील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता पर्यंत अनेक मराठा मोर्चे शांततेत पार पडले, सामान्य नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र आता आक्रमक होण्याची गरज असून सरकारने लवकरात लवकर योग्य पाऊल उचलावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. उद्या पुण्यासह मुंबईत दुधाचा तुटवडा जाणवु शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा