भोसले फार्मसी कॉलेज, मेडीकेअर क्लिनिक व अमिता फार्मसीचा उपक्रम
सावंतवाडी
मळगाव-सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाजवळील नंदनगरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.तुषार रुकारी, एनएसएस विभाग प्रमुख प्रा.ओवी पराडकर, डॉ.विक्रम आजगेकर, डॉ.दिपाली परब, अमिता परब, सौरभ सावंत आदी उपस्थित होते.
कोरोना साथीच्या काळात अनेक रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोचू शकत नाहीत. त्यातही डायबेटिस, ब्लडप्रेशरसारख्या रुग्णांना त्यांची नियमित तपासणी करण्यात अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्यांना या तपासण्या करणे सोपे जावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.