विठ्ठल हे नाम ! सदा मुखी राही !!
रूप तुझे पाही ! निरंतर !!
केशवा माधवा ! गजर जाहला !!
नाद तो घुमला ! पांडुरंग !!
टाळ चिपळीला ! साथ अभंगाची !!
विठ्ठल नामाची ! लागे गोडी !!
वैष्णव नाचती ! होऊनिया दंग !!
मुखात अभंग ! तुकयाचे !!
रिंगण सोहळा ! भान हरपले !!
नयन दिपले ! पाहुनिया !!
अबीर गुलाल ! उधळीत चाले !!
तालावर डोले ! वारकरी !!
चंद्रभागे तीरी ! वारकरी गोळा !!
भरला तो मेळा ! पंढरीत !!
विठ्ठल चरणी ! टेकियेला माथा !!
भाग्य हे सर्वथा ! उजळीले !!
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६