सिंधुदुर्गनगरी
अपंग बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह, गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव सुविधा पुरवणाऱ्या शासकीय निवासी संस्था, सांगली जिल्ह्यातील मिरज येथील किल्ला भाग मिरज येथे ही संस्था कार्यरक आहे.
प्रवेशासाठी पात्रताता पुढीलप्रमणे आाहेत. वय 6 ते 14 वर्षे अस्थिव्यंग प्रवर्ग, जिल्हा शल्य चिकित्सकांचा किमान 40 टक्के अपंगत्वाच दाखला आवश्यक. या संस्थेत शिक्षणसह वसतीगृह, भौतिकोपचार शस्त्रक्रिया व भोजन व्यावस्था इ. सुविधा पुरविल्या जातात.
या संस्थेतील प्रवेशासाठी अधिक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारी, मिरज या पत्त्यावर तसेच 0233,2222513, 9921212919, 9860642680, 9325555981, 9422216459, या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन अधिक्षक, शासकीय अपंग बालकगृह व शाळा यांनी केले आहे.