सिंधुदुर्गनगरी
केंद्र शासनाच्या आयकर विभागाव्दारे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी प्रविण्यधारक खेळाडूंकरिता विविध पदांच्या भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. पद भरतीकरिता भारतीय शालेय खेल महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू पात्र ठरणार आहेत. तरी संबधित खेळाडूची स्पर्धेतील कामगिरी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रमाणित करुन देणे आवश्यक आहे.
कोव्हिड-19 विषाणुच्या प्रादूर्भाचाच विचार करता, राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी प्रमाणित करण्याकरिता संचालनालय येथे उपस्थित राहणे धोक्याचे ठरु शकते. या भरतीकरिता पात्र खेळांडूनी आयकर विभागाच्य जाहिरातीलतील खेळ प्रकार ॲथलॉटिक 100 मी, 200 मी,800 मी,1500 मी,5000 मी, 10,000 मी, 100 मी हर्डल्स, लांबउडी, तिहेरीउडी, गोळाफेक, थाळी फेक, भालाफेक, हातोडाफेक, पोलव्हॉल्ट, उंचउडी इत्यादी. जलतरण, 100 मी बटर फ्लाय, 100 मी बेस्ट स्टोक,100 मी बॅक स्टोक, 100 मी स्टाईल इत्यादी. स्क्वॅश, बिलीअर्डस, बुध्दीबळ, कॅरम, ब्रीज, बॅडमिंटन, लॉनटेनिस, टेबल टेनिस, शुटींग, वेटलिफिटंग, बॉक्सींग, ज्युदो आपली कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंची खेळाडू प्रमाणपत्र प्रमाणित करण्याकरिता 14 ऑगस्ट 2021 पर्यत व्यक्तीश: उपस्थित राहून सादर करावेत. असे आवाहन विजय शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी, यांनी केले आहे.