रस्ता मोजतोय शेवटच्या घटका : वाहनचालक करताहेत तारेवरची कसरत;ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा
बांदा
असनिये व घारपी गावात अनेक पर्यटन स्थळे असल्याने सदैव वाहनांची वर्दळ सुरू असते. बांदा-असनिये मार्गावरील तांबोळी ते असनिये दरम्यान रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत. आठ दिवसांतून एक तरी अपघात खड्डे वाचविताना होत असून झोपी गेलेल्या प्रशासनास जाग कधी येणार असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे.
सदर रस्ता शेवटच्या घटका मोजत असल्याने निदान सद्यस्थितीत तात्पुरती तरी तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी, वाहनचालक, प्रवासी व नागरिकांमधून होत आहे. असनिये गावातील नागरिकही रस्ता दुरूस्तीसाठी आक्रमक झाले असून त्वरित रस्ता दुरूस्त करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.