You are currently viewing सिंधुदुर्गातील सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढविण्याचा काँगेस चा नारा

सिंधुदुर्गातील सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढविण्याचा काँगेस चा नारा

जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले येथे कॉग्रेसची भरगच्च बैठक

प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गातील सर्व सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा सोमवारी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिला. काँगेस पक्षच देशाचे नेतृत्व करू शकतो, अशी भावना महागाईमुळे होरपळलेल्या जनतेची झालेली आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जनतेशी नाळ जुळवा, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी यांना केले.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधा, कार्यकर्त्यांना ऊर्जा द्या, संभाव्य उमेदवार आतापासून ठरवा, असे आवाहन दादासाहेब परब यांनी केले.
जिल्हा काँग्रेस प्रवक्ते इर्शाद शेख यांनी पक्ष संघटना वाढीसाठी मार्गदर्शन केले. दरम्यान, या बैठकीस काही अपरिहार्य कारणामुळे कार्याध्यक्ष विलास गावडे उपस्थित राहू शकले नाहीत.

वेंगुर्ला तालुका काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामींनी मंगल कार्यालयात झाली.
यावेळी काँग्रसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब परब, महिला जिल्हाअध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते इर्शाद शेख, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, सावंतवाडी तालुका वेंगुर्ला तालुका माजी पंचायत उपसभापती सिधेश परब, ओबोसी सेल जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग नाटेकर, सौ. कृतिका कुबल, महेश डीचोलकर, उत्तम चव्हाण, मयूर आरोलकर, अंकुश मलबारी, पांडुरंग लोणे, विजय खाडे, रावजी परब, प्रशांत परब, सखाराम परब, कृष्णा आचरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा