सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅरम चॅम्पियन म्हणून ओळख असलेल्या निरवडे ता. सावंतवाडी येथील अर्जुन माळकर वय ५५ यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पोलिओमुळे एका पायाने अपंग असताना सुद्धा श्री माळकर यांनी कॅरमच्या जीवावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला होता. अनेक बक्षिसे आणि अजिंक्यपदे मिळून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती.