सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात दिनांक 02 जुलै 2021 ते 08 जुलै 2021 या आठवड्यातील कोविड बाधित रुग्णांचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट (आरटीपीसीआर टेस्टच्या आधारे) 10.7% असून दिनांक 09 जुलै 2021 ते दिनांक 15 जुलै 2021 या आठवड्यातील सरासरी पॉझिटिव्हीटी रेट (आरटीपीसीआर टेस्टच्या आधारे) हा 7.42 % इतका आहे. पॉझिटिव्हीटी रेटचे अवलोकन करता सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 9.06 असून सद्दस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा स्तर 3 मध्ये समाविष्ट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात दि. 27 जुलै 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत स्तर 3 चे निर्बंध लागू असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
1. या आदेशात म्हटले आहे. अ.क्र. सेवा / आस्थापना / उपक्रम स्तर तीन नुसार निर्बंध / सुट 1. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी सायंकाळी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील.
2. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार बंद राहतील.
3. मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह बंद राहतील.
4. रेस्टॉरंट्स / हॉटेल्स / होम स्टे /खानावळ सोमवार ते शुक्रवार (Weekdays) सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 % आसन क्षमतेुनसार Dining • सायंकाळी 04.00 नंतर पार्सल सेवा चालू राहील व • शनिवार आणि रविवार (Weekend) फक्त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहील.
5. सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग दररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत
6. खाजगी आस्थापना / कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत.
दिनांक 04 जून, 2021 च्या निर्देशानुसार वगळण्यात आलेल्या सर्व आस्थापना जसे खाजगी बॅंका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर बॅंकीग वित्त संस्था इ. कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील.
7. कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये) 50% उपस्थितीसह सुरु राहतील.
• कोरोना विषयक कामे करणा-या आस्थापना, मान्सुनपूर्व कामांशी संबंधीत यंत्रणा / कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
8. खेळ बाहेर मोकळ्या जागेत (Outdoor) सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 व सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत.
9. चित्रीकरण सुरक्षित आवरणामध्ये (Bubble) सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत मुभा.
• सायंकाळी 05.00 वाजलेनंतर कुठेही वावरण्यास मनाई (No Movement Outside Bubble)
10. सामाजिक, सांस्कृतिक / करमणूकीचे कार्यक्रम सोमवार ते शक्रवार सभागृह/हॉल आसन क्षमतेच्या 50 % उपस्थितीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत
11. लग्नसमारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत
12. अंत्ययात्रा / अंतविधी जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत
13. बैठका / निवडणूक -स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा सभागृह / हॉल आसन क्षमतेच्या 50% लोकांच्या उपस्थितीत.
14. बांधकाम फक्त बांधकाम साईटवर निवासी / वास्तव्यास मुभा
• बाहेरुन मजूर आणण्याचे बाबतीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत.
15. कृषि व कृषि पुरक सेवा संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील.
16. ई कॉमर्स वस्तू व सेवा नियमित पूर्ण वेळ – दररोज
17. जमावबंदी / संचारबंदी • जमावबंदी (5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मज्जाव) सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत • संचारबंदी सायंकाळी 05.00 नंतर (फक्त अत्यावश्यक कामांसाठी मुभा)
18. व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स दररोज सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50% पूर्व परवानगीसह (Appointment) ए.सी.च्या वापरास मनाई
19. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस) पूर्ण आसन क्षमतेने परंतू प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे.
20. माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील.
21. खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/ लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहतील. जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई पास आवश्यक राहील.
22. उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधीत घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमई सह. नियमित पूर्ण वेळ. दररोज
23. उत्पादक घटक १. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. 2. सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत
सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना :-
१. अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा सदर दुकानामधून सेवा घेणाऱ्या व्यक्ती यांना सायंकाळी 05.00 वा. नंतर हालचाल / प्रवास करणेस परवानगी असणार नाही.
२. जेंव्हा जेंव्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता आहे त्यावेळी वाहनात असणाऱ्या सर्व प्रवाशांना वैयक्तिक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही.
३. कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना ही 100% उपस्थितीसह सुरु राहतील.
४. उपरोक्त ज्या मुद्यांमध्ये आसन क्षमतेचा उल्लेख आहे अशा सर्व आस्थापनांनी त्यांची एकूण आसन क्षमता घोषित करणारा फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. अन्यथा ते कारवाईस पात्र ठरतील.
अत्यावश्यक सेवा मध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल
1) रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनिक्स, लसीकरण केद्रं, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतुक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जंतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभूत कच्चा माल उद्योग आणि अनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचा देखील समावेश असेल.
2) शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा / दवाखाने, ॲनिमल केअर सेंटर व पेट फुड शॉप.
3) वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज.
4) विमान चलन आणि संबंधीत सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभालदुरुस्ती, कार्गो, ग्राऊंड सर्व्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.)
5) किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने (चिकन, मटण, मासे, अंडी आणि पोल्ट्री दुकाने), संस्था, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने, छत्री दुरुस्ती करणारी दुकाने, प्लॅस्टीक शिट, ताडपत्री, रेनकोट इ. वस्तू विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने तसेच दिनांक 15 मे ते 20 मे या कालावधीतील चक्री वादळामुळे तसेच यापुढे येणाऱ्या मान्सुन कालावधीमध्ये घर तसेच इतर बांधकामे यांची दुरुस्ती तसेच सुरक्षितता यासाठी करावयाच्या उपाययोजनासाठी आवश्यक साहित्य विक्री करणारी दुकाने.
6) शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा.
7) सार्वजनिक वाहतुक व्यवस्था जसे की, विमान सेवा, रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक बसेस.
8) विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा.
9) स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे.
10) स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा .
11) रिर्झव्ह बॅक ऑफ इंडिया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा
12) सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूत संस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ संस्था.
13) दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी.
14) मालाची / वस्तुंची वाहतुक.
15) पाणीपुरवठा विषयक सेवा.
16) शेती संबंधीत सर्व