देवगड
महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नंदकिशोर कांदळगावकर यांची प्रदेश अध्यक्ष विजय वैती यांनी निवड केली आहे. कांदळगावकर यांनी यापूर्वी देवगड तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष, देवगडमधील सहकारी संस्थांमध्ये पदे भूषविली आहेत. ते कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून त्यांच्या निवडीचे जिल्हयातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.