दहावीचा निकाल म्हणजे
जणू युद्धजन्य परिस्थिती.
आज निकाल लागणार पण,
कुठे आहे कुणाला भीती.
कधी दहावीत गेलो,
कुठे शिकवण्या केल्या.
एक ना अनेक प्रश्नपत्रिका
कधी कोणी सोडवल्या.
ऑनलाईन अभ्यासामुळे,
महागडा मोबाईल मिळाला.
वर्ग भरले आपल्याच घरात,
अभ्यासाचा ताण पळाला.
होणार म्हणता दहावीची,
परीक्षाच ती रद्द झाली.
अभ्यासाच्या निमित्ताने
मोबाईलने गट्टी केली.
निकाल काय लागणार,
चिंताच नाही उरली.
शाळेत न जाता केव्हाच,
दोन वर्षे अशीच सरली.
गुणवत्ता ही मुलांची
आता कशी कळणार.
हुशार असो वा ढब्बू,
एका पारड्यात तोलणार.
(दिपी)
©दीपक पटेकर