सातवा वेतन आयोग सर्व महामंडळाला जाहीर केला व ऐन वेळेस तोट्यात सुरू असलेल्या एसटी महामंडळाला त्यामधून वगळून कर्मचाऱ्यांची घोर निराशा केली…
खर तर कठीण प्रसंगी जीवाची परवा न करता आपले काम चोख बजावणारी संस्था म्हणून गावागावात एसटी ची ओळख आहे
आज हलाखीची परिस्थिती एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर ओढवली असून, आज सर्व कर्मचाऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. आणि अशा संस्थेच्या कर्मचाऱ्याला वगळून इतर महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू करून एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर एका प्रकारचे मीठ सोडण्याचा प्रकार आज राज्य सरकारने केला आहे. व त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसून आल्याशिवाय राहणार नाही.
सदर गंभीर बाब महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष मा. हरी माळी हे याबद्दलचा जाब संबंधित व्यक्तींना विचारल्याशिवाय राहणार नाहीत, खरतर सर्व पुढाऱ्यांनी मिळूनच आज एसटी महामंडळाला तोट्यात आणले आहे. यामध्ये बिचाऱ्या कर्मचाऱ्यांचा काही दोष नसताना सुद्धा त्यांना या सर्व गोष्टीचे परिणाम भोगावे लागत आहे.
एसटी महामंडळाला तोट्यात आणून व दाखवून, काही नेते मंडळी एसटीला खाजगीकरण करण्याच्या मार्गावर आहेत याचा या आधीपण मनसेने तीव्र विरोध केला होता व अजूनही तो सुरू आहे.
अशा परिस्थितीमध्ये सर्व कामगारांनी आता स्वतःच्या हिताचे लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेच्या पाठीशी उभे राहून एक महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाज उठवावा असे आवाहन नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी केले आहे.