You are currently viewing पालकमंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात…

पालकमंत्र्याच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात…

चार पोलीस जखमी ; जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल..

वैभववाडी येथे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचा आज शिवसंपर्क अभिनयानाचा दौरा होता.हा दौरा आटपून सायंकाळी उशिरा पालकमंत्री आपल्या ताफ्यासहित कणकवलीकडे येत असताना कासार्डे तळेकरवाडी दरम्यान ताफ्यातील पोलीसांच्या वाहनाला ताफ्यातील आरसीपीच्या पोलीस गाडीची धकड बसून अपघात झाला.या अपघात चार पोलीस जखमी झाले
या पोलिसांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत अधिक माहिती साठी संपर्क साधला असता याबाबतचे अधिक वृत्त समजू शकले नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा