राफेलनंतर एफ-१५ ईएक्स लढाऊ विमान भारताच्या ताब्यात दाखल !
मुंबई :
भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कधीही संघर्ष वाढेल या पार्श्वभूमीवर भारताने हवाईदलाची शक्ती वाढविण्यासाठी राफेल लढाऊ विमानानंतर अमेरिकेकडून ‘एफ-१५ ईएक्स’ हे अत्यंत संहारक विमान खरेदी करण्याची योजना केली आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी भारताला घेरण्याचे कटकारस्थान आखत आहे. तर अशा परिस्थितीत भारत आपल्या हवाईदलाची शक्ती वाढवण्यासाठी अमेरिकेकडून एक लढाऊ विमान खरेदी करत आहे. जे कुठल्याही क्षणी शत्रूची दाणादाण उडू शकते. भारताने राफेलनंतर हे लढाऊ विमान खरेदी करण्याची योजना आखली आहे.
भारतीय हवाईदल अमेरिकेकडून ‘एफ-१५ ईएक्स’ लढाऊ विमान खरेदी करण्याची शक्यता असून, हे विमान तयार करणारी अमेरिकन कंपनी बोईंगने यांनी हे विमान भारताला देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव भारताने स्वीकारून विमान खरेदी केल्यास भारतीय हवाईदलाची ताकद कैकपटीने वाढणार आहे.
लढाऊ विमानामध्ये हवेत होणाऱ्या डॉग फाइट मध्ये ‘एफ-१५ ईएक्स’ हे लढाऊ विमान जगातील सर्वात संहारक विमान आहे. आत्तापर्यंत सहभागी झालेल्या मोहिमांमध्ये १००% या विमानाने यश संपादन केले आहे. आतापर्यंत शत्रूचे कुठलेही विमान या विमानाची शिकार करू शकले नाही. एफ-१५ ईएक्स हे लढाऊ विमान २.५ मॅक म्हणजे सुमारे ३००० किमी प्रतितास वेगाने शत्रू देशाच्या कुठल्याही भागात लढाई करून विध्वंशक घडवून आणू शकते. तसेच आपल्यापासून शेकडो किमी दूर असलेले शत्रूचे विमान किंवा रडारला नष्ट देखील करू शकते. या विमानाचे अजून एक खास वैशिष्ट्य आहे की, हे विमान आपल्यासोबत १४ टन (१४००० किलोग्रॅम) वजनाची स्फोटके नेऊ शकते. तसेच शत्रूच्या गोटात मोठा संहार घडून आणू शकते.
‘एफ-१५ ईएक्स’ विमानामध्ये डबल इंजिन असून ते अत्यंत शक्तिशाली आहे. अन्य विमानाच्या तुलनेत याला कमी इंधन लागते. या विमानाचा वेग आणि दारूगोळा नेण्याची क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे युद्ध मैदानात हे विमान अत्यंत प्रभावशाली ठरू शकते. हे विमान २२ एअर टू एअर क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकते. हायपरसोनिकसारखी विध्वंशक क्षेपणास्त्रे डागू शकते. या विमानाची रडार प्रणाली अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे आपल्याला लक्ष्याच्या शोध तात्काळ लागू शकेल. एकाच वेळी अनेकांच्या लक्ष्यांचा भेद हे विमान करू शकते.
अमेरिकेकडे ‘एफ-३५’ हे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान असून देखील ‘एफ-१५ ईएक्स’ हे अनेक बाबतीत त्यापेक्षा वरचढ आहे. त्यामुळेच ‘८० एफ-१५ ईएक्स’ विमाने खरेदी करण्याकरिता अमेरिकेनेही ऑर्डर दिली आहे. एफ-१५ ईएक्स हे एफ-१५ विमानाची सुधारित आवृत्ती आहे. या विमानाचा इतिहास सुद्धा तितकाच प्रभावशाली असून जगातील विविध लढायांमध्ये या विमानाने १०४ हून अधिक विमाने पाडली आहेत. या दरम्यान मात्र एकदाही ‘एफ-१५ विमान’ कोसळले नाही. तसेच जगातील कुठलीही क्षेपणास्त्र प्रणाली या विमानाला भेदू शकलेली नाहीत. त्यामुळे भारतीय हवाई दलात एफ-१५ ईएक्स हे लढाऊ विमान अत्यंत महत्वाची भुमिका बजावणार आहे.