You are currently viewing 18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

18 वर्षावरील वयोगटासाठी लसीकरण सत्र

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र शुक्रवार दि. 16 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणीची सोय देखील उपलब्ध आहे. तरी 18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित रहावे व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

              या लसीकरण सत्रादरम्यान उपलब्ध लसींची माहिती पुढीलप्रमाणे आहे. वैभववाडी तालुक्यात वैभववाडी – 260, उंबर्डे – 200. कणकवली तालुक्यात खारेपाटण – 200, कासार्डे – 200, कनेडी – 200, फोंडा – 200, कळसुली – 200, वरवडे – 200, नांदगाव – 200, उपजिल्हा रुग्णालय कणकवली – 260. देवगड तालुक्यात पडेल 200, मोंड – 200, फणसगाव – 200, मिठबांव – 200, इळिये – 200, शिरगाव -200, ग्रामीण रुग्णालय देवगड – 260. मालवण तावुक्यात आचरा – 200, मसुरे – 200, चौके – 200, गोळवण – 200, हिवाळे – 200, पेंडूर कट्टा ग्रामीण रुग्णालय 100, मालवण ग्रामीण रुग्णालय 260. कुडाळ तालुक्यात कडावल – 200, कसाल – 200, पणदूर – 200,हिर्लोक – 200, माणगाव – 200, वालावल – 200, कुडाळ ग्रामीण रुग्णालय 260, जिल्हा सामान्य रुग्णालय – 260. वेंगुर्ला तालुक्यात परुळा – 200, अडेली – 200, तुळस – 200, रेडी – 200, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय – 250, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा – 100, सावंतवाडी तालुक्यात मळेवाड – 200, सांगेली – 200, निरवडे – 200, आंबोली – 200, बांदा – 200, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी – 260. दोडामार्ग तालुक्यात भेडशी – 200, मोरगाव – 200, तळकट – 200, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग  – 260 अशा एकूण 9 हजार 930 लसीचे डोस उपलब्ध असणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा