या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन.
वैभववाडी.
मार्च २०२० पासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाची पहिली लाट समाप्त झाली असून दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन व जनजागृती करण्यासाठी “नैसर्गिक आपत्ती व कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीची पूर्वतयारी” या विषयावर मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते व प्रशिक्षक मा.विनयकुमार आवटे मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. विजयजी लाड असणार आहेत. या प्रबोधनात्मक ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ पंचायत महाराष्ट्र संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
https://meet.google.com/fbo-jxsm-yvr
या वरील गुगल मीट लिंकवरून ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेता येईल.
अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष- प्रा.श्री.एस. एन.पाटील (9834984411), उपाध्यक्ष- श्री.एकनाथ गावडे (9689077595), संघटक- श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर (9422379090), सचिव-श्री.संदेश तुळसणकर (9420100946) यांच्याशी संपर्क साधावा.
सदर व्याख्यान शनिवार दिनांक १७ जुलै रोजी रात्री ठीक आठ वाजता होणार आहे.