वेंगुर्ले :
वेंगुर्ले तालुक्यात २-३ दिवस सुरू असलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला असून मंगळवारी १३३.२ मि.मी. एवढी पावसाची नोंद असून आत्तापर्यंत एकूण १२७४.२ एवढी नोंद झाली. या मुसळधार पावसाने वेंगुर्ले – सावंतवाडी मुख्य मार्गावर तुळस घाटी येथील रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी खचली. सदरील साईड पट्टी ही मे महिन्यामध्ये खचली होती. परंतु ती सार्वजनिक बांधकाम विभागाने भर घालून व्यवस्था केली होती. परंतु दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने या रस्त्याची पुन्हा खचली गेली असून त्या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी वाहने चालवावीत, असे आवाहन तुळस सरपंच शंकर घारे यांनी केले आहे.