You are currently viewing महाराष्ट्र लवकरच ‘अनलॉक’..

महाराष्ट्र लवकरच ‘अनलॉक’..

 

राज्यातील निर्बंधांबाबत सतत सुरू असलेल्या धरसोडीमुळे व्यापारी तसेच नोकर वर्गात असंतोषता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून महाराष्ट्र टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची तयारी सुरू आहे. मात्र मुंबईत लोकल प्रवास तूर्त सर्वांसाठी खुला होणार नाही.अनलॉक कशाप्रकारे केले जावे याबाबत सूचना करणारा अहवाल कोविड टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना दिल्याचे समजते. यावर याच आठवड्यात चर्चा करून अनलॉक ची सुरुवात केली जाईल.

कोरोनाची तिसरी लाट लागली असून आणखीन खबरदारी घेण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना सांगितले. मात्र महाराष्ट्रात सुरू असलेले निर्बंध हटवण्याची जोरदार मागणी व्यापाऱ्यांकडून झाली आहे. ती पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीनेही निर्बंध बाबतच्या धरसोड धोरणाबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. एक तर पुन्हा संपूर्ण अनलॉक करा. नाहीतर सर्व व्यवहार पूर्ण:त खुले करा असे, उद्गार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी काढले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा