मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचे सततधार मंगळवारीही जिल्ह्यात कायम राहिली. माणगाव, पीठढवळ ,भंगसाळी, वेताळ-बांबर्डे, आदी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे.मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कर्ली, वाघोटन , तिलारी या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली नसली तरी अनेक नद्या आणि उपनद्या तुडुंब भरून वाहत आहे. काही गावे संपर्क हीन असून जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .