You are currently viewing जिल्ह्यात 2 लाख 48 हजार 186 जणांनी घेतला पहिला डोस

जिल्ह्यात 2 लाख 48 हजार 186 जणांनी घेतला पहिला डोस

 सिंधुदुर्गनगरी, 

जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 48 हजार 186 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

 यामध्ये एकूण 9 हजार 796 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 97 जणांनी दुसरा डोस घेतला.  9 हजार 874 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 154 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 89 हजार 416 व्यक्तींनी पहिला डोस तर 30 हजार 602 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 87 हजार 856 नागरिकांनी पहिला डोस तर 15 हजार 622 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 51 हजार 244 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 463 व्यक्तींनी दुसरा डोस  घेतला आहे. असे एकूण 3 लाख 13 हजार 124 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 1 हजार 620 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 24 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 77 हजार 140 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 36 हजार 943 कोविशिल्ड आणि 76 हजार 181 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 13 हजार 124 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 2 हजार 420 लसी उपलब्ध असून त्यापैकी 1 हजार 40 कोविशिल्डच्या आणि 1 हजार 380 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 3 हजार 490 लसी शिल्लक असून त्यापैकी 3 हजार 230 कोविशिल्ड आणि  260 कोवॅक्सीनच्या लसी  शिल्लक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा