कसं सांगू मी तुला
आतुर मी भेटीसाठी
वाट पाहत बसले होते,
सख्या तुझी नदीकाठी.
संथ निळ्या पाण्यात,
प्रतिबिंब माझेच दिसे.
ढग आठवणींचे तुझ्या,
नभात सारे दाटले भासे.
आठवणींच्या पावसात,
वाटे तुझ्यासवे भिजावे.
तू माझा पाऊस हो,
का भिजण्या दूर जावे.
बेभान होऊनी झेलला,
पाऊस तुझ्या आठवांचा.
मिटले नयन पाहत होते,
नजारा तुझ्याच स्वप्नांचा.
ओलिचिंब मी मिठीत,
अंग अंग माझे शहारले.
सख्या तुझ्या स्पर्शाने,
फुलांवाचून मी मोहरले.
(दिपी)✒️
©दीपक पटेकर,
८४४६७४३१९६