दोडामार्ग :
दिवाणी न्यायालय दोडामार्ग यांच्यावतीने १ ऑगस्ट रोजी दिवाणी न्यायालयात सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोकअदालीत पक्षकारांची प्रलंबित असलेली फौजदारी व दिवाणी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी, आदी प्रकरणे तसेच वीज कंपनी, वित्तीय संस्था, बँका, दूरसंचार निगम, ग्रामपंचायत आदी तसेच वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात येणार आहे. कोणत्याही पक्षकार वकील यांस न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये पूर्व बोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास त्यांच्यासाठी १९ जुलैपासून कार्यालयीन दिवशी दररोज दुपारी २ ते २.३० वाजता वेळ देण्यात येणार आहे.