कुडाळ:
कोनबॅकने बांबू प्रक्रियेच्या माध्यमातुन देश विदेशात केलेली क्रांती पाहून महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सरचटणीस रविंद्रजी चव्हाण भारावून गेले. त्यांनी या प्रकल्पाचे संचालक मोहन होडवडेकर यांना या प्रकल्पाची भरभराट होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, माजी राज्यमंत्री व डोंबिवलीचे आमदार रवींद्रजी चव्हाण हे आज सागरकन्या मासे मार्केटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोऱ्यावर होते. त्यांनी एम आय डी सी येथील कोन बॅकच्या शो रूम व कारखान्याला भेट दिली . कोनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर यांनी कोनबॅकच्या वाटचालीची चित्रफीत दाखवत देश विदेशात चालू असलेली व पूर्ण झालेल्या कामांची माहिती दिली. रविंद्रजी चव्हाण यांनी कारखान्याला भेट देवून बांबू वरील प्रक्रिया पाहून वस्तू उत्पादनाची माहिती घेतली.यावेळी संचालक मोहन होडावडेकर यांनी त्यांना बांबू उत्पादित गणेश मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुण स्थलांतरित होवू नये म्हणुन रविंद्रजी चव्हाण गेल्या काही वर्षापासून निलक्रांती, शोभिवंत रंगीत मासे निर्मिती, हळद लागवड, बुश मिरी उत्पादन अशा विविध विषयावर प्रयोग करत आहेत त्यातूनच सावंतवाडी येथे मत्स्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंग कळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्याबाबत लुपिन फाउंडेशन चे प्रताप चव्हाण यांच्याशी सखोल चर्चा केली तसेच जंगली वनस्पती लागवड व त्यासंबंधी आवश्यक बाबीवर चर्चा केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल, देवेंद्र सामंत, विजय केनवडेकर, गणेश कूशे, निलेश तेंडुलकर, बंड्या सावंत, संदीप पाटील, मोहन सावंत, रुपेश कानडे, प्रकाश मोरये, श्रावण शिरसाट आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.