सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 115.27 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक मालवण तालुक्यात 139 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1586.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 81(1605), सावंतवाडी – 113(1756.1), वेंगुर्ला – 133.20(1285.8), कुडाळ – 98(1422), मालवण – 139(1763), कणकवली – 111(1713), देवगड – 118(1478), वैभववाडी – 129(1661), असा पाऊस झाला आहे.