You are currently viewing वेंगुर्लेत भाजपाकडून पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का

वेंगुर्लेत भाजपाकडून पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का

शिवसेना तालुका कार्यालय प्रमुखासह , महीला उपशहर प्रमुख व शिरोडा ग्रामपंचायत सदस्याचा भाजपा मध्ये प्रवेश

वेंगुर्ला

वेंगुर्लेत भाजपा कडून पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का देण्यात आला. शिवसेना तालुका कार्यालय प्रमुखासह, महीला उपशहर प्रमुख व शिरोडा ग्रामपंचायत सदस्याचा भाजपा मध्ये प्रवेश झाला. वेंगुर्ले मध्ये भाजपा ने पुन्हा एकदा शिवसेनेला खिंडार पाडले. यापूर्वी सुद्धा युवा सेनेचे क्रियाशील प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता.

वेंगुर्ले मध्ये मच्छिमार्केट च्या उद्घाटन प्रसंगी आलेले भाजपा प्रदेश सरचिटणीस व आमदार रविंद्र चव्हाण व युवकांचे प्रेरणास्थान आमदार नितेशजी राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना तालुका कार्यालय प्रमुख व जेष्ठ शिवसैनीक तुकाराम ऊर्फ छोटु कुबल, वेंगुर्ले महिला उपशहर प्रमुख सौ.वृंदा मोर्डेकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्या सौ. प्राची प्रकाश नाईक यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला.

शिवसेनेचे ” इनकमिंग ” म्हणता म्हणता भाजपा मध्ये ” इनकमिंग ” सुरु !

चारच दिवसापूर्वी शिवसेनेची सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या बैठकीत खासदार विनायक राऊत व माजी पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जुना नवा वाद न करता एकदिलाने काम करुन शिवसेनेमध्ये ” इनकमिंग ” सुरु करा असे आवाहन केले होते. परंतु वेंगुर्ले तालुक्यात या उलट भाजपाने शिवसेना पदाधिकारी यांना भाजपा मध्ये घेऊन ” इनकमिंगची ” सुरवात केली.

या प्रवेशाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना आमदार नितेशजी राणे म्हणाले की ही सुरवात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच मुळ शिवसैनिक नाराज आहेत. कारण मुळ शिवसैनीक हे हिंदुत्ववादी आहेत व सध्या सुरु असलेल शिवसेनेचे काँग्रेसीकरण मुळ शिवसैनिकांना मान्य नाही. तसेच हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच काँग्रेस विचारसरणीला कडाडून विरोध केला, परंतु आता सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली हे सच्च्या शिवसैनिकांना मान्य नसल्याने ते नाराज आहेत. यावेळी आम.नितेशजी राणे यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यकारणीचे अभिनंदन केले तसेच कोवीड काळात व तौक्ते चक्रिवादळग्रस्थांना केलेल्या मदत कार्याचे कौतुक केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करुन भाजपा मध्ये सर्वांचा सन्मान केला जाईल असे अभिवचन दिले. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जेष्ठ नेते राजु राऊळ, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व मनिष दळवी, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , तुळस सरपंच शंकर घारे , ता.चिटनीस जयंत मोंडकर , समीर कुडाळकर , नितीन चव्हाण ,समीर चिंदरकर .ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस व निलेश सामंत , युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर , शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , कुशेवाडा सरपंच स्नेहा राऊळ , शिरोडा उपसरपंच राहुल गावडे , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , परुळे शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे , महिला जिल्हा सरचिटणीस सारीका काळसेकर , महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , माजी चेअरमन प्रकाश राणे , शिरोडा शहर अध्यक्ष संदीप धानजी , हसीना बेन मकानदार , ग्रा.प. सदस्या सम्रुद्धी धानजी व वेदीका शेटये , संतोष शेटकर तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा