सावंतवाडी
येथील आगारातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या आणखीन काही बसफेऱ्या उद्यापासून सुरू होणार आहेत,अशी माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली.दरम्यान प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.याबाबत श्री.पडोळ यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, उद्यापासून सुरू होणाऱ्या बस फेऱ्यामध्ये सावंतवाडी ते पुणे-निगडी आंबोली मार्गे ०७:१५वा.,सावंतवाडी ते तुळजापूर आंबोली मार्गे ०९:००वा.,सावंतवाडी ते पुणे-निगडी (शिवशाही ) १८:४५ वा.,सावंतवाडी ते कोल्हापूर आंबोली मार्गे १०:३०वा.,१२:३० वा.,१३:४५ वा.आणि १४:४५ वा.,कोल्हापूर ते सावंतवाडी गगनबावडा-कणकवली ०५:००वा.,कोल्हापूर ते सावंतवाडी आंबोली मार्गे ०६:१५ वा.,०८:३०वा.,१२:३०वा.,१५:३०वा. आणि १७:०० वा.,सावंतवाडी ते रत्नागिरी ०७:३०वा. १०:०० वा. आणि १३:०० वा. रत्नागिरी ते सावंतवाडी ०६:००वा., ०७:०० वा. आणि १७:०० वा.,सावंतवाडी ते दोडामार्ग ०७:०५वा., ०८:००वा , ०९:००वा., १२:३० वा.,१७:००वा.,सावंतवाडी ते शिरोडा ०७:०० वा., ०८:००वा., १३:३० वा.,१५:३० वा.,१७:०० वा., सावंतवाडी ते केर दोडामार्ग ०८:००वा., केर ते दोडामार्ग १०:३०वा., दोडामार्ग ते केर १३:३०वा. आदींचा समावेश आहे.