परभणी – :
महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयचे प्रदेश चिटणीस मयुर मोरे यांची प्रदेशाध्यक्ष आमीर शेख यांनी मराठवाडा समन्वयकपदी नेमणूक केली.
केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. महागाईने जनतेचे जगणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या सूचनेनुसार या जीवघेण्या महागाई विरोधात राज्यभर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. राज्यात विभागीय पातळीवर प्रत्येक विभागात दि.11 जुलै ते 17 जुलै दरम्यान विविध आंदोलने करण्यात येणार आहेत. या आंदोलनासाठी मराठवाडा विभागाचे समन्वयक म्हणून मयुर मोरे यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहेत. विभागातील प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्याशी आंदोलने यशस्वी करण्यासाठी मोरे हे समन्वय साधून तो अहवाल प्रदेशाध्यक्ष आमीर शेख यांना सादर करणार आहेत.