You are currently viewing सिंधुदुर्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात; तिघेजण जखमी

सिंधुदुर्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात; तिघेजण जखमी

राष्ट्रवादीचे नेते काका कुडाळकर यांनी दाखल केले रुग्णालयात

 

कुडाळ :

मुंबई- गोवा महामार्गावरील झाराप कारगिल हॉटेल जवळ सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागाच्या सायबर क्राईम च्या बोलोरो गाडी स्लिप होऊन जवळच असलेल्या झाडीत जाऊन धडकली या अपघातात सायबर क्राईम चे तीन कर्मचारी जखमी झाले त्यांच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

आज (शनिवारी) सांयकांळी सायबर क्राईम विभागाचे पोलिस त्यांच्या शासकीय बोलोरो गाडीने सावंतवाडीहून सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे जात होते. या दरम्यान झाराप येथे आले असता त्यांची गाडी स्लिप झाली आणि महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडीत जावून धडकली व अपघात झाला. या गाडीमधील स्वप्नील तोरसकर (वय- ३१), बळीराम सुतार (वय ४०), महादेव साबळे (वय ३१) हे तीन ही पोलिस कर्मचारी जखमी झाले.

या दरम्यान या ठिकाणाहून जात असणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर व पत्रकार निलेश तेंडुलकर यांनी या तीनही जखमी पोलिसांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणले.

सदरच्या या गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदरच्या अपघाताची माहिती मिळताच कुडाळ ग्रामीण रूग्णालयात कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी जावून जखमी पोलीसांची विचारपुस केली. तसेच घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला. या गाडीला कशामुळे अपघात झाला याचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा