तूफान फटाक्यांची आतिषबाजी
कुडाळ :
कोकणचे बुलंद नेतृत्व, अगदी अल्प कालावधी हाती मिळाला असता नाही कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवडीने कोकणात भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याची लाट उसळली आहे. कुडाळात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी रणजित देसाई, ओंकार तेली, विनायक राणे, पप्या तवटे, राजवीर पाटील, दीपक नारकर, रूपेश कानडे, सुनील बांदेकर, राकेश कांदे, देवेंद्र नाईक, निलेश परब, बंड्या सावंत, मंगेश चव्हाण, सतीश माड्ये, अविनाश पराडकर, संध्या तेरसे, रेखा कानेकर, अस्मिता बांदेकर, आदिती सावंत, मुक्ती परब, तसेच अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.