निलेश- नितेश यांनी पेढा भरवत केला आनंद साजरा
सिंधुदुर्ग :
कोकणचा आवाज आता दिल्लीत घुमणार याचा आनंद साऱ्या राणेसमर्थकांच्या तसेच भाजपा कार्यकर्त्यांच्या मनातून ओसंडून वाहत आहे. खास. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तळागाळातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. हा आनंद त्यांच्या कुटुंबियांनीही जल्लोषात साजरा केला.
माजी खास. निलेश राणे आणि आम. नितेश राणे यांनी एकमेकांंना पेढा भरवून नारायण राणेंना मिळालेल्या केंद्रीय मंत्रीपदाचा आनंद साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपा कार्यकारणीने नारायण राणेंवर टाकलेली नवी जबाबदारी ते यशस्वीपणे निभावतील, असा विश्वासही यावेळी निलेश राणे आणि नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.ळत