देशातील वाढती महागाई, पेट्रोल, गॅस या जिवनावश्यक वस्तुंची केंद्र सरकारने भरसाठ दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनतेला याचा प्रचंड प्रमाणात मोठा फटका बसत आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोडामार्ग तालुक्याच्यावतीने दोडामार्ग तहसिलदार अरुण खानोलकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेलकर, जिल्हा उपाध्यक्ष संदिप गवस, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष दिपक जाधव, व्हि जे एन टी तालुकाध्यक्ष संदेश वरक, शहरअध्यक्ष सुदेश तुळसकर, अो बि सी सेल तालुकाध्यक्ष उल्हास नाईक, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष नवराज कांबळे, अॅड. प्रविण नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तहसिलदार यांचे बरोबर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ दोडामार्ग तहसीलदारांना राष्ट्रवादीचे निवेदन
- Post published:जुलै 7, 2021
- Post category:दोडामार्ग / बातम्या / राजकीय / विशेष / सामाजिक
- Post comments:0 Comments
You Might Also Like
अशक्य आहे विसरणे तुला
म.भा.चव्हाण या थोर व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करुन माझे हात पवित्र झाले __ कामगार भुषण पुरुषोत्तम सदाफुले
१० हजार तरुणांना जर्मनीत पाठविण्याचे आश्वासन देण्यापेक्षा राणेंनी आपल्या दोन्ही मुलांना जर्मनीमध्ये पाठवावे मग सिंधुदुर्गात रोजगार उपलब्ध होईल
