सिंधुदुर्गनगरी
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमा”चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि. 8 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे हे उमेदवारांशी संवादही साधणार आहेत.
या योजनेअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय ( जनरल ड्युटी असिस्टंट) व राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय (जनरल ड्युटी असिस्टंट, पंचकर्मा टेक्निशियन, व क्षरा टेक्निशियन) यांना प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे होम हेल्थ एड आणि इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन – बेसीक या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. होम हेल्थसाठी 10 वी पास आणि इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियनसाठी 12 सायन्स ही शैक्षणिक पात्रता आहे. दोन्ही कोर्सना प्रत्येकी 30 या प्रमाणे एकूण 60 उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.
ट्रेनिंगनंतर उमेदवारांना सेक्टर स्किल कौन्सिलचे प्रमाणपत्र दिले जाईल. भविष्यात नोकरीसाठी या प्रमाणपत्राचा फायदा होणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्रमांक – 9403350689, 8208193220, ई-मेल – sindhudurgrojgar@gmail.com येथे संपर्क साधावा असे आवाहन सुनिल पवार, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी केले आहे.