You are currently viewing साळगाव येथे कृषी दिन साजरा

साळगाव येथे कृषी दिन साजरा

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांचा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो . कृषि विभाग जिल्हा परीषद, सिंधुदूर्ग, पंचायत समिती कुडाळ व ग्रामपंचायत साळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरिय कृषि मेळाव्याचे आयोजन 1 जुलै 2021 रोजी ग्रामपंचायत साळगाव येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला कृषिदिनाचे औचीत्य साधुन, श्री.राजेंद्र सखाराम धुरी यांचे शेतावर महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा शुभारंभ काजू लागवड व बांधावर बांबू लागवड करून करणेत आला.

तसेच श्री.धुरी यांच्याच शेतावर महिला बचत गटाच्या माध्यमातून हळद लागवड पीक प्रात्यक्षीकाचा देखील शुभारंभ करणेत आला. त्यानंतर एमएसआरएलएमच्या उमेद अभियानाअंतर्गत सावली ग्राम सेवा संघ यांनी, महिला व बालकांना सकस आहार व औषधी वनस्पती गावातच उपलब्ध होणेसाठी महत्वपूर्ण ठरणा-या न्युट्रीगार्डनचा शुभारंभ करणेत आला.

सदर शुभारंभ श्रीम.संजना सावंत, अध्यक्ष, जि.प.सिंधुदूर्ग, आमदार  वैभव नाईक, अरूण दुधवडकर, प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सिंधुदूर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी शर्वाणी गांवकर, सभापती महिला व बालकल्याण समिती, जि.प.सिंधुदूर्ग, रणजित देसाई, जि.प.सदस्य,संजय कापडणीस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जयभारत पालव उपसभापती, पं.स.कुडाळ, जि.प.सदस्य नागेंद्र परब, संजय पडते व अमरसेन सावंत, सुधिर चव्हाण, कृषि विकास अधिकारी, जि.प.सिंधुदूर्ग, अडसुळे उपविभागिय कृषि अधिकारी सावंतवाडी, डॉ.शिंपी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, घोलप जिल्हा मृदसर्वेक्षण अधिकारी,  विजय चव्हाण गट विकास अधिकारी पं.स.कुडाळ, मोहन भोई सहा.गट विकास अधिकारी पं.स.कुडाळ, रमाकांत कांबळे तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी बाळकृष्ण परब, विस्तार अधिकारी (कृषि) सखाराम सावंत, दत्ताराम आंबेरकर, महादेव खरात, रामचंद्र जंगले, अमित देसाई, मंदार पाटील उपस्थित होते.

 

कृषि मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  करणेत आली.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती श्री.राजेंद्र म्हापसेकर यांनी प्रास्ताविकात सिंधुदूर्गातील शेतक-यांनी केरळीयन लोकांचे अनुकरण करून अननस लागवडीखाली जास्तीत जास्त क्षेत्र आणणेबाबत तसेच हळद लागवडीतून सुवर्णक्रांती वर लक्ष देणेबाबत आवाहन केले.

डॉ.प्रसाद देवधर, भगिरथ प्रतिष्ठान, झाराप यांनी दुभत्या जनावरांसाठी मुरघास कास फायदेशीर ठरू शकतो हे पटवून दिले. श्री.सिद्दान्ना म्हेत्रे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , सिंधुदूर्ग यांनी कृषि खात्याच्या योजनांची माहिती दिली. श्री.रणजित देसाई माजी उपाध्यक्ष ,जि.प.सिंधुदूर्ग यांनी जिल्हा परीषदेच्या कृषि विषयक नाविन्यपूर्ण योजनांची माहिती दिली. सौ.नुतन आईर सभापती, पं.स.कुडाळ , यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कृषि दिनाच्या निमित्त जिल्हयातील प्रगतशिल शेतकऱ्यांचा सत्कारही करणेत आला. यामध्ये राज्यस्तरीय भात पिक स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते शेतकरी श्री.लक्ष्मण अनंत वराडकर, रा.केळुस, ता.वेंगुर्ले तसेच शेतिनिष्ठ शेतकरी शिवप्रसाद देसाई, रा.बांदा, ता.सावंतवाडी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करणेत आला.

 

 

 

 

 

 

तसेच शासनाच्या विविध योजनांतर्गत उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना देखील गौरवीणेत आले.

यामध्ये राष्ट्रिय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये सन 2020/21 मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेले ग्रामसेवक श्री.गुरुनाथ गावडे, ग्रामपंचायत गोठोस, श्रीम.साईसंजिवनी मयेकर, ग्रामपंचायत डिगस, श्रीम.अश्विनी कुंभार, ग्रामपंचायत हिर्लोक, त्याचप्रमाणे सन 2019/20 मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेले ग्रामविकास अधिकारी वैभव सावंत, ग्रामपंचायत वाडोस, संतोष कविटकर, ग्रामपंचायत डिगस, सुनिल मळगावकर, ग्रामपंचायत अणाव यांचा समावेश होता.

अन्य सत्कारामध्ये महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीमध्ये मध्ये उत्कृष्ठ कामगीरी केलेले ग्रामविकास अधिकारी भिमराव घुगे, ग्रामपंचायत पिंगुळी, श्रीम.सुषमा कोनकर,ग्रामपंचायत तु.क.नारुर यांचा सत्कार करणेत आला.

प्रजित नायर ,मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.सिंधुदूर्ग यांनी जिल्ह्यातील शेतक-यांसाठी बोली भाषेत शेतीविषयक मार्गदर्शन करणारे यु ट्युब चँनेल जि.प.च्या माध्यमातून सुरू करणेबाबत सुतोवाच केले. अध्यक्षिय विचार व्यक्त करताना श्रीम.संजना सावंत , अध्यक्ष, जि.प.सिंधुदूर्ग यांनी पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जिल्ह्यातील शेतक-यांनी आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन केले.

यावेळी श्रीम.शर्वाणी गांवकर , सभापती महिला व बालकल्याण समिती , जि.प.सिंधुदूर्ग ,.संजय कापडणीस , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , .जयभारत पालव उपसभापती , पं.स.कुडाळ, जि.प.सदस्य .नागेंद्र परब ,.संजय पडते व .अमरसेन सावंत , सुधिर चव्हाण , कृषि विकास अधिकारी , जि.प.सिंधुदूर्ग , अडसुळे उपविभागिय कृषि अधिकारी सावंतवाडी , डॉ.शिंपी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, .घोलप जिल्हा मृदसर्वेक्षण अधिकारी,  .विजय चव्हाण ,गट विकास अधिकारी पं.स.कुडाळ , .मोहन भोई सहा.गट विकास अधिकारी पं.स.कुडाळ , रमाकांत कांबळे ,तालुका कृषि अधिकारी, डॉ..अजित मळीक , पशुधन विकास अधिकारी .मोहन सावंत माजी सभापती, .मोहन सावंत माजी उपसभापती,.दिनेश साळगावकर माजी जि.प.सदस्य ,कृषि अधिकारी .प्रफुल्ल वालावलकर , .बाळकृष्ण परब , विस्तार अधिकारी (कृषि) .सखाराम सावंत , .दत्ताराम आंबेरकर.महादेव खरात,.रामचंद्र जंगले , .अमित देसाई , .मंदार पाटील, माजी नगराध्यक्ष .विनायक राणे ,पणदुर सरपंच .दादा साईल, बांव सरपंच .नागेश परब , तु.क.नारूर सरपंच नागेश आईर , माजी सरपंच तेर्सेबांबर्डे रूपेश कानडे , माजी सरपंच पावशी.तवटे , उमेद अभियानचे . गणेश राठोड तसेच माणगांव पंचक्रोशीतील ग्रामसेवक व शेतकरी  उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साळगांव सरपंच .उमेश धुर, उपसरपंच अमित दळवी, ग्राम विकास अधिकारी श्रीम.सोनिया पांजरी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा