सिंधुदुर्गनगरी
जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी वन स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कोरोना काळात एक व दोन्ही पालक गमावलेली मुलं यांची सर्वांगीण काळजी व संरक्षण संकटग्रस्त विधवा महिलांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणेसाठी कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून कार्यवाही सुरु आहे. जिल्हास्तरावर अशी बालके व महिला यांच्या संदर्भातील तपशिलावर माहिती संकलनाचे काम सुरु करण्यात आले आहे. या निराधार मुलांना व विधवा महिलांना लाभ देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष ,सिंधुदुर्ग यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची माहिती देण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, 02362-228869 या दूरध्वनी क्रमांकावार आणि संकटग्रस्त महिलांची माहिती देण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर 02362-229039 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ,व्ही.सी.म्हात्रे यांनी केले आहे.