कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ११ मुलांना आर्थिक मदत
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी कृषिदिनानिमित्त जिल्हा बँकेच्या परीसरात आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ११ मुलांना आर्थिक मदतीचा धनादेश आ.वैभव नाईक, आ.दीपक केसरकर यांच्या हस्ते देण्यात आला.
त्याचबरोबर जिल्ह्यात भाताचे अधीक उत्पन्न घेणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शाल श्रीफळ व जांभूळ झाडाचे रोप देऊन गौरव करण्यात आला. भात खरेदीसाठी ज्या संस्थांनी चांगले काम केले अशा पाच विकास सेवा सोसायटीचा गौरव करण्यात आला. जांभळाची जिल्ह्यातीलच लवकर पिकणारी जात शोधून त्याची कलमे करणारे वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे श्री. देसाई यांचाही सत्कार करण्यात आला.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी नामदेव गवळी यांचा सेवा निवृत्तिपर सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ व जांभुळ झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.