इच्छुकांनी सहकार्य करण्याचे आवाहन.
महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांचा प्रदेश. इथल्या सह्याद्रीच्या हरएक शिखरावर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची निशाणी उभी आहे. परंतु सध्याच्या काळात या गडकिल्ल्यांची अवस्था अतिशय दयनिय झालेली आहे. स्वराज्याची ही निशाणी ढासळू लागलीय. परंतु या स्थितीत अनेक शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटत आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे ‘घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा’ म्हणत दुर्गसंवर्धनाचे काम करणारे ‘सह्याद्री प्रतिष्ठान’. याच सह्याद्री प्रतिष्ठान’ मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील फुकेरी गावात असणाऱ्या हनुमंत गडावरीवरील दोन तोफांना तोफगाडे बसविण्याचे योजण्यात आले आहे. यासाठी इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि ज्यांना हे इतिहासाचे दाखले टिकावेत असं प्रामाणिकपणे वाटतं, अशा सर्वांनीच आपल्या हातून जेवढं शक्य असेल, तेवढं आर्थिक सहकार्य करावं आणि दुर्गसंवर्धनाच्या कार्यात आपला हातभार लावावा, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने करण्यात आलं आहे.
गडावरील तोफा सुरक्षित रहाव्यात, त्यांची हानी होवू नये, यासाठी हनुमंत गडावर तोफगाडा बसविण्यात येणार आहे. याकामी ज्यांची सहकार्य करण्याची इच्छा आहे, त्यांनी स्वराज्य निधी देवून सहकार्य करावे. आपली आर्थिक मदत खाली दिलेल्या अधिकृत कंत्राटदार यांच्या बँक खात्यावर अथवा फोन पे नंबरवर जमा करता येईल.
अधिकृत कंत्राटदार
बबन पारधी
Account No. 60138002391
Bank of Maharashtra
IFSC Code MAHB0000877
Branch कशेळे ता. कर्जत
फोन पे/ गूगल पे
विवेक गावडे -9545728929
गणेश जाधव -8976311180